Maharashtra Assembly Election 2024: बुधवारी (20 नोव्हेंबर) रोजी राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मुंबईतील वरळी (Worli) मतदारसंघात यंदा चुरशीची लढत आहे. मुंबईतील वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) विरुद्ध संदिप देशपांडे विरुद्ध मिलिंद देवरा (Milind Deora) हे तीन प्रमुख उमेदवार असून या तिघांपैकी कोण बाजी मारणार हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. मात्र, त्या आधी सुरू असलेल्या मतमोजणीत शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वेळचे विजयी आमदार आदित्य ठाकरे 597 मतांनी पिछाडीवर आहेत. मिलिंद देवरा 18,204 मतांनी आघाडीवर आहेत. तर मनसेचे संदिप देशपांडे 8282 मतांसह पिछाडीवर आहेत.
आदित्य ठाकरे 597 मतांनी पिछाडीवर
वरळीत आदित्य ठाकरे ५९७ पिछाडीवर, तर मिलिंद देवरा हे आघाडीवर आहेत#Mahayuti #MahaVikasAghadi #ElectionsResults #MarathiNews #vidhansabhaelection2024 #vidhansabha #VidhanSabhaElection #AssemblyElections #Mahayuti
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) November 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)