मुंबईतील गणपती विसर्जनसाठी केवळ देशभरातून नाही तर परदेशातूनही बाप्पाचे भक्त मुंबईत (Mumbai) हजेरी लावतात. दरम्यान मुंबईत मोठी गर्दी असते. मुंबईतील विविध भागात सार्वजनिक मंडळाकडून गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात येते. बाप्पाला अलविदा करण्यासाठी गणेशभक्त विशेष दक्षिण मुंबईत दाखल होतात. तरी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभुमिवर मुंबई लोकलसंबंधी रेल्वे प्रशासनाकडून विशेष निर्णय घेण्यात आला आहे. गणपती विसर्जनानिमित्त मध्यरात्री मेन लाइन आणि हार्बर मार्गावर विशेष 10 लोकल (Local Train) चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडून (Central Railway) गणेशभक्तांना हे विशेष गिफ्ट देण्यात आलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)