Ganesh Visarjan 2024: गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस. राज्यभरात ठिकठिकाणी गणपती मूर्तींचे विसर्जन सुरु आहे. मुंबई आणि पुण्यात तर उद्या पहाटेपर्यंत हे विसर्जन सुरु राहणार. अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी गिरगाव चौपाटीवरील गणपती विसर्जनाला हजेरी लावली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हेही उपस्थित होते. नेत्यांनी गणेशोत्सव विसर्जन सोहळ्यानिमित्त श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुरक्षेच्या कामाचाही आढावा घेतला. (हेही वाचा: Ganpati Visarjan Tragedy in Dhule: गणपती विसर्जनावेळी धुळ्यात मोठा अपघात; ट्रॅक्टरखाली चिरडून तीन मुलींचा मृत्यू)
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde attends Ganpati Visarjan in Mumbai
Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis, Union Minister Ramdas Athawale and Maharashtra Governor CP Radhakrishnan were also present with him
(Source: BMC) pic.twitter.com/FbGiIMTjnd
— ANI (@ANI) September 17, 2024
| गिरगाव चौपाटी, मुंबई | गणेशोत्सव विसर्जन सोहळ्यानिमित्त मुंबई महानगरपालिका आयोजित श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यासाठी तयार केलेल्या शामियानावर मान्यवरांची उपस्थिती.#LIVE https://t.co/YfGMr6HNnn
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)