Ganpati Visarjan Tragedy in Dhule: गणपती विसर्जनावेळी धुळ्यात मोठा अपघात; ट्रॅक्टरखाली चिरडून तीन मुलींचा मृत्यू (Video)
पोलिसांनी ट्रॅक्टर व चालकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅक्टर चालक दारूच्या नशेत होता आणि त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपी चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
Ganpati Visarjan Tragedy in Dhule: महाराष्ट्रातील धुळ्यात गणेश विसर्जनाच्या वेळी भीषण अपघात झाला आहे. धुळे शहरालगत असलेल्या चित्तोर गावात ट्रॅक्टरने चिरडून तीन मुलींचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यात गणेश विसर्जनासाठी ग्रामस्थ ट्रॅक्टरमध्ये गणेशमूर्ती घेऊन जात होते. त्यावेळी समोर नाचणाऱ्या लोकांवर ट्रॅक्टर धावला. या भीषण अपघातात 3 मुलींचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर व चालकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅक्टर चालक दारूच्या नशेत होता आणि त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपी चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या दुःखद घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. (हेही वाचा: Thane Murder: ठाण्यात निघृण हत्या, डोके नसलेले शरीर इमारतीच्या टेरेसवर आढळलं; पोलिस तपास सुरु)
गणपती विसर्जनावेळी धुळ्यात मोठा अपघात-
Truck carrying Ganpati idol for visarjan in Maharashtra's Dhule runs over many dancing on dhol.
3 children have died in the accident.#Maharashtra pic.twitter.com/jgb1GbioZQ
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) September 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2024 08:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

