विविध देशांमधील वेगवेगळ्या सर्व्हेंमध्ये ईमेलद्वारे सहभाग नोंदवलेल्या अनेक नागरिकांना सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. सायबर गुन्हेरांकडून झालेल्या इमेल हल्ल्याचा सर्वाधिक फटका भारतीय संस्थांना बसला आहे. ईमेलद्वारे करण्यात आलेल्या सायबर हल्ल्यातून सावरण्यासाठी आणि सामग्रीची पुनर्प्राप्ती करण्यासाठी आर्थिक खर्चही मोठ्या प्रमाणावर आला . हा खर्च साधारण 1 दशलक्ष डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये अंदाजे रु 8.2 कोटी रुपये इतका आहे, असे वृत्त वृत्तसंस्था आयएनएसने एका अहवालाच्या हवाल्याने दिले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एकूण कंपन्यांपैकी जवळपास 82% कंपन्या किमान एकदा तरी सायबर हल्ल्याच्या त्यातही इमेल द्वारे झालेल्या सायबर हल्ल्याच्या बळी ठरल्या आहेत.
ट्विट
Indian organisations are among the most likely to be hit with a successful email attack, and those affected faced an average potential cost of over $1 million (approx Rs 8.2 crore) for their most expensive attack, a new report said on Thursday. pic.twitter.com/7r6M5O0UPo
— IANS (@ians_india) February 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)