Cyber Crime: सायबर गुन्हेगारांकडून (Cybercriminals) पोलीस अधिकारी, केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI), अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB), भारतीय रिझर्व बँक (RBI), सक्तवसुली संचालनालय आणि इतर कायदे अंमलबजावणी संस्थांचे अधिकारी असल्याचे भासवून ब्लॅकमेल, खंडणीखोरी आणि डिजिटल अ‍ॅरेस्टच्या तक्रारी राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. आता गृह मंत्रालयाने एक परिपत्रक जारी करून, सरकारी अधिकाऱ्यांची तोतयागिरी करणाऱ्या सायबर गुन्हेगारांकडून ब्लॅकमेलिंग आणि डिजिटल अटकेच्या धमक्यांविरोधात नागरिकांनी सतर्क राहावे असे सांगितले आहे.

अशा गुन्ह्यांपासून नागरिकांना दक्ष राहण्याचा आणि अशा प्रकारच्या फसवणुकीविरोधात जागरुकतेचा प्रसार करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. असे कॉल आल्यास नागरिकांनी तातडीने या प्रकाराची तक्रार 1930 या सायबरक्राईम हेल्पलाईनवर किंवा www.cybercrime.gov.in यावर करावी आहे मंत्रायालयाने म्हटले आहे. (हेही वाचा: Cyber-Crime And Financial Frauds: सायबर गुन्हे-आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी DoT चा मोठा निर्णय; 28,200 मोबाइल हँडसेट होणार ब्लॉक, 20 लाख क्रमांकांची पुनःपडताळणी)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)