Maharashtra Bomb Threat: भारत-पाकिस्तान तणाव परिस्थीतीदरम्यान देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही नेहमीच दहशतवाद्यांच्या रडारवर असते. आता राज्यात बॉम्ब ब्लास्ट ( Bomb Blast ) होणार असल्याचा धमकीचा एक मेल महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला (Maharashtra Police Control Room ) मिळाला आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. या मेलमध्ये 2 दिवसात बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच राज्यातील कुठल्याही भागाला दुर्लक्ष करू नका, असंही या मेलमध्ये म्हंटलं आहे. हा मेल कोणी केला याचा तपास सध्या सुरू आहे. सोमवार ते बुधवारदरम्यान सर्वांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात बॉम्ब ब्लास्टची धमकी
An anonymous email warning of a bomb blast within the next two days has been received by the Maharashtra Police Control Room and forwarded to Mumbai Police. The email gave no specific time or location but urged authorities not to ignore the threat. Police are investigating and… pic.twitter.com/GbKuETRCKP
— IANS (@ians_india) May 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)