Cylinder Blast In Vikhroli: मुंबईतील (Mumbai) विक्रोळी (Vikhroli) परिसरात शनिवारी रात्री सिलेंडरच्या स्फोटामुळे (Cylinder Blast) आग (Fire) लागल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार, धनंजय मिश्रा (वय, 46) हे अंदाजे 99 टक्के भाजले असून राधेश्याम पांडे (वय, 45) हे 92 टक्के भाजले आहेत.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम सोसायटी, संजय नगर येथील एका झोपडीत रात्री 9:35 च्या सुमारास स्फोट झाला. ज्यामुळे विद्युत वायरिंग आणि घरातील सामान जळून खाक झाले. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच पाण्याच्या बादल्या वापरून आणि विद्युत पुरवठा खंडित करून आग विझवण्यात आली होती. (हेही वाचा -Building Collapsed in Belapur: नवी मुंबईच्या बेलापूर मध्ये चार मजली इमारत कोसळून दुर्घटना!)
पहा व्हिडिओ -
#WATCH | Mumbai, Maharashtra: Two people were severely injured after a fire broke out due to a cylinder blast in the Shriram Society of the Vikhroli area in Mumbai. The injured have been admitted to Rajawadi Hospital for treatment.
(Visuals from the spot) https://t.co/S7eXusxPBX pic.twitter.com/gOVNSenmmJ
— ANI (@ANI) July 27, 2024
जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. स्थानिक नागरिकांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली. (NMMC Revokes Water Cuts: धरणाची पातळी वाढल्याने नवी मुंबईमधील पाणी कपात रद्द; येत्या 29 जुलैपासून पाणी पुरवठा नियमितपणे सुरू )
दरम्यान, 25 जुलै रोजी बोरिवलीच्या पश्चिम उपनगरातील कनकिया बिल्डिंगला गुरुवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली होती. धुरामुळे गुदमरल्यामुळे एका वृद्ध रहिवाशाचा मृत्यू झाला होता. तसेच इतर तीन जणांवर उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, बोरिवली पूर्वेतील मागाठाणे मेट्रो स्थानकासमोरील कनकिया समर्पण टॉवरला भीषण आग लागली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)