Belapur | X

नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये बेलापूरला (Belapur) आज पहाटे चार मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. सेक्टर 19 मधील शाहबाज गावामधील (Shahbaz village) ही घटना आहे. पहाटे 4.30 च्या सुमारास ही घटना घडली असून एका रिक्षाचालकाच्या सजगतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

रिक्षा चालकाला इमारतीखाली असताना पिलर मधून आवाज येत असल्याचं जाणवलं त्याने तातडीने इमारतीमधील सार्‍‍यांना जागे केले आणि 15 मिनिटामध्ये इमारत रिकामी केली. दरम्यान त्यानंतर काही मिनिटांतच सारी इमारत कोसळली. या दुर्घटनेत 2 वृद्ध अडकले होते मात्र लोकांनी त्यांना बाहेर काढले आहे. NMMC Revokes Water Cuts: धरणाची पातळी वाढल्याने नवी मुंबईमधील पाणी कपात रद्द; येत्या 29 जुलैपासून पाणी पुरवठा नियमितपणे सुरू .

सध्या मातीच्या ढिगार्‍यात कोणी अडकले आहे का? याचा सध्या प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे. जखमींना अपोलो रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.  अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरु आहे. ही इमारत जुनी होती मग त्याच्यासाठी नोटीस बजावली गेली होती का? याचा आता तपास सुरू आहे.