Mumbai Road Accident: मुंबईतील विक्रोळी (Vikhroli Road Accident) येथे आज मंगळवार, 20 मे रोजी एसयूव्ही आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. झालेल्या हायस्पीड टक्करमध्ये दोन जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये टक्कर झाल्यानंतरची दृश्ये दिसत आहेत. ज्यात एसयूव्ही (SUV Car Accident) उलटली असून टेम्पो समोरून खराब झाला आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई वाहतूक पोलिस परिस्थिती हाताळण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)