व्यापारी संघटनांच्या विनंतीच्या आधारे महानगरपालिका प्रशासनाने दुकानावरील पाट्या मराठीमध्ये लिहिण्यास मुदतवाढ दिली आहे. याबाबत वाढीव मुदतीत देखील सुधारणा न केल्यास कारवाई होणार आहे. मुंबई महानगरातील दुकाने व आस्थापना यांच्या मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी, दिनांक 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
BMC extends deadline for #Marathi name boards on shops in #Mumbai till September 30. pic.twitter.com/zamz3pzNwT
— Richa Pinto (@richapintoi) July 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)