दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला पायी चालत जात असतात. ही पदयात्रा म्हणजे आषाढी वारी. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. वारीमध्ये आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंडातील वारीला जात होते, असे सांगितले जाते.

वारा, पाऊस, ऊन यांची तमा न बाळगता परब्रह्माला साठवीत साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी उन्मत्त वाटचाल म्हणजे पंढरीची वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी. पंढरीची वारी अद्वितीय, अविस्मरणीय, अवर्णनीय, अतुल्य व अद्भूत असा अनुभव आहे. यंदाच्या आषाढी वारीच्या निमित्ताने पुरुषोत्तम महाराज पाटील दादा यांनीदेखील वारी म्हणजे नेमके काय हे त्यांच्या शब्दात मांडले आहे. सध्या या गोष्टीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)