Shanti Swaroop Dies:  तेलुगु वृत्त वाचक शांती स्वरूप यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यांना शहरातील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेलुगूमध्ये बातम्यांचे वाचण करणारे हे पहिले व्यक्ती होते. शांती स्वरूप यांनी प्रेक्षकावर वेगळीच छाप पाडली होती. 4 नोव्हेंबर 1983 पासून त्यांनी दूरदर्शनवर बातम्या वाचायला सुरुवात केली. शांती स्वरूप हे नाव आहे ज्याला तेलुगू भाषिक लोकांच्या परिचयाची गरज नाही. 2011 मध्ये निवृत्ती होईपर्यंत ते दूरदर्शनमध्ये कार्यरत राहिले. त्यांना जीवनगौरव पुरस्कारही मिळाला. (हेही वाचा- अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, आरोपी पोलिसाचा मुलगा, थरारक घटना CCTV कैद

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)