Rajastan Murder Video: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, आरोपी पोलिसाचा मुलगा, थरारक घटना CCTV कैद

राजस्थान येथील जयपूर मध्ये करणी विहार परिसरात तरुण भाजी विक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे.

Rajastan Murder Video: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, आरोपी पोलिसाचा मुलगा, थरारक घटना CCTV कैद
rajastan Murder Video PC TWitter

Rajastan Murder Video: राजस्थान येथील जयपूर मध्ये करणी विहार परिसरात एका तरुण भाजी विक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पीडितेला क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण करून हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण करणारा आरोपी हा पोलिसांचा मुलगा असल्याचे समजत आहे. हत्या केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- मद्यधुंद अवस्थेत मित्राची हत्या, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

प्राप्त माहितीनुसार, राजस्थान मधील ही घटना मंगळवारी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. क्रिकेटच्या बॅटने तरुणाला बेदम मारहाण करण्यात आले. अमानुष मारहाणीत तरुणाने जीव गमावला. या घटनेची पोलिस पुढील चौकशी करत आहे. क्षीतिज शर्मा असं आरोपीचे नाव आहे. तर मोहन असं  हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते.ही सपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे,  तरुण रस्त्यावरून जात असताना अचानक आरोपी समोरून आला आणि त्याने थेट तरुणाच्या डोक्यात बॅट मारली. बेदम मारहाणीत तरुण जमीनीवर पडला. त्यानंतर मदतीसाठी आरडाओरड ऐकून आरोपीच वडिल बाहेर आले. एकाने घटनास्थळी धाव घेतला. बेदम मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. दोघे ही काही वेळाने घटनास्थळावरून निघून गेले. हल्ल्यानंतर एकाने कारमधून जखमीला रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात जाई पर्यंत उशीर झाला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दखल घेतली. आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी आणि मोहन यांच्यात काही मुद्यांवरून वाद झाला होता त्यामुळे त्याने रागाच्या भरात त्याला मारहाण केली आणि मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2024 12:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).