Uttar Pradesh Murder Video: मद्यधुंद अवस्थेत मित्राची हत्या, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद, गाझियाबाद येथील घटना
Uttar Pradesh Murder Video PC TWITTER

Uttar Pradesh Murder Video: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. ही निर्घृण हत्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी आणि मृत हे दोघे ही मित्र होते अशी माहिती समोर आली आहे.  (हेही वाचा- पतीसोबत प्रियकरालाही घरात ठेवण्याचा महिलेचा आग्रह

मिळालेल्या माहितीनुसार, मोमीन असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो 22 वर्षाचा होता. गौरव सिंह, राज कुमार आणि अंकित यांनी मोमीनची हत्या केली. हत्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर घटनास्थळी सर्व तपासणी केली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्यांना अटक केले. पोलिसांनी मृतदहे ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, आरोपींनी तरुणाला क्षुल्लक काराणांमुळे मारहाण केली. लोखंडी रॉर्डने तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाणीत तरुण खाली पडला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित केले.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहे. आरोपीला मारहाण्यात आलेला लोखंडी रॉड पोलिसांनी ताब्यात घेतला.

कोणत्या कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आली आहे हे पोलिस तपास करत आहे. आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते. हत्या करण्यापूर्वी आरोपी आणि मृत एकत्र दारू पिण्यास बसले होते. पोलिस या घटनेचा आणखी तपास करत आहे. घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.