VIDEO: पतीसोबत प्रियकरालाही घरात ठेवण्याचा महिलेचा आग्रह; प्रेमासाठी 3 मुलांची आई चढली विजेच्या खांबावर

महिलेचे एका तरुणाशी प्रेमसंबंध आहेत व तिला आपल्या प्रियकराला आपल्या घरात ठेवायचे आहे. पतीने याला नकार दिल्याने तिला राग आला यानंतर ती प्रियकरासाठी विजेच्या खांबावर चढली.

VIDEO: पतीसोबत प्रियकरालाही घरात ठेवण्याचा महिलेचा आग्रह; प्रेमासाठी 3 मुलांची आई चढली विजेच्या खांबावर
प्रेमासाठी 3 मुलांची आई चढली विजेच्या खांबावर

गोरखपूरच्या पिपराइच परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक महिला प्रेमासाठी चक्क विजेच्या खांबावर चढली व खाली उतरण्यास नकार दिला. ही महिला विवाहित असून तीन मुलांची आई आहे. अहवालानुसार, महिलेचे एका तरुणाशी प्रेमसंबंध आहेत व तिला आपल्या प्रियकराला आपल्या घरात ठेवायचे आहे. पतीने याला नकार दिल्याने तिला राग आला यानंतर ती प्रियकरासाठी विजेच्या खांबावर चढली. महिला खांबावर चढल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस आणि विद्युत पथकही घटनास्थळी पोहोचले. नंतर महिलेची समजूत काढून तिला खाली उतरवण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिपराइचच्या सरैया बाजार कबाडी रोडवर असलेल्या एपीजे अब्दुल कलाम प्रायव्हेट आयटीआयजवळ ही घटना घडली. पिपराईच पोलीस महिलेला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.

(हेही वाचा: Kuwait Car Crash: समुद्रकिनाऱ्यावर भरधाव कार चालवत स्टंटबाजी; तरूण थोडक्यात बचावला)

पहा व्हिडिओ- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2024 06:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).