PIB Fact Check: भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशन होत आहे. एकीकडे सरकार नागरिकांच्या सोयीसाठी अनेक पोर्टल, वेबसाईट सुरु करत आहे, तर दुसरीकडे सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. जनतेच्या वैयक्तिक माहितीची चोरी ही बाब आर्थिक फसवणुकीइतकीच गंभीर होत चालली आहे. आता फसवेगिरी करणाऱ्या लोकांकडून एक बनावट कोविन साईट (CoWIN Site) तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत प्रेस ब्युरो ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. त्यांच्यामते ‘https://demo.co-vin.in’ नावाची एक वेबसाइट कार्यरत असून, ती अधिकृत कोविन साईट ‘https://cowin.gov.in’ ची बनावट साईट आहे. पीआयबीने या खोट्या वेबसाइटवर कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका असा सल्ला दिला आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, अधिक माहितीसाठी COWIN ची अधिकृत वेबसाइट https://cowin.gov.in ला भेट द्या. (हेही वाचा: RBI Fine On ICICI-YES Bank: RBI ने येस बँक आणि ICICI बँकेला ठोठावला मोठा दंड; शेअर्सवरही दिसून आला परिणाम)
पहा पोस्ट-
📣 Fake Website Alert
A website "https://t.co/s6UVtA0G8l" is impersonating the official CoWIN site#PIBFactCheck
▶️ For accurate information, visit the official CoWIN website: 🔗https://t.co/x6ee8MoDVJ
▶️ Be cautious & avoid sharing personal information on suspicious websites pic.twitter.com/WLzXBl7zYO
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)