RBI Fine On ICICI-YES Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने खाजगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियामक आरबीआयच्या म्हणण्यानुसार, येस बँक (Yes Bank) आणि आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) अनेक नियमांचे पालन करत नव्हते. त्यामुळे येस बँकेला 91 लाख रुपये आणि आयसीआयसीआय बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड (Fine) ठोठावण्यात आला आहे.
आरबीआयने सोमवारी सांगितले की, येस बँकेने ग्राहक सेवेसह अंतर्गत आणि कार्यालयीन खात्यांशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. अनेक प्रकरणांमध्ये, अपुऱ्या शिलकीमुळे बँकेने अनेक खात्यांमधून शुल्क वसूल केले. तसेच अंतर्गत व कार्यालयीन खात्यातून बेकायदेशीर कामे होत होती. (हेही वाचा - RBI Record Dividend To Government: आरबीआयने आर्थिक वर्ष 2023-24 साठी भारत सरकारला ₹2.11 लाख कोटींचा विक्रमी लाभांश जाहीर केला)
RBI च्या तपासात असे आढळून आले की, येस बँकेने 2022 मध्ये अनेक वेळा असे केले. पार्किंग निधी आणि ग्राहकांचे व्यवहार मार्गी लावण्यासाठी बँकेने आपल्या ग्राहकांच्या नावे काही अंतर्गत खाती उघडली. कायदेशीर आणि नैतिक दोन्ही दृष्टीकोनातून हे चुकीचे होते. (हेही वाचा - Zomato Payment: झोमॅटो कंपनीकडून पेमेंट एग्रीकेटर परवाना RBI ला परत, जाणून घ्या कारण)
आयसीआयसीआय बँकेचे प्रकरण काय आहे?
RBI ला ICICI बँक कर्ज आणि ऍडव्हान्सशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळली. याचा फटका या खासगी बँकेला एक कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आयसीआयसीआय बँकेने कर्ज मंजूर करताना गंभीर निष्काळजीपणा दाखवला. त्यांनी अर्धवट चौकशी करून कर्ज मंजूर केले. यामुळे बँकेची आर्थिक जोखीम म्हणजेच कर्ज बुडण्याचा धोका वाढला आहे.
आरबीआयच्या कारवाईचा परिणाम दोन्ही बँकांच्या शेअर्सवरही दिसून आला. येस बँकेचे शेअर्स 22.80 रुपयांवर व्यवहार करत होते, सुरुवातीच्या व्यापारात बीएसईवर 1 टक्क्यांहून अधिक घसरण होते. त्याच वेळी, ICICI बँक 0.28 टक्क्यांच्या घसरणीसह 1,126.95 वर व्यवहार करत होता.