आतापर्यंत तुम्ही सापाच्या चाव्याने लोकांच्या मृत्यूच्या बातम्या ऐकल्या असतील, मात्र आता उत्तर प्रदेशमधून याच्या अगदी उलट प्रकरण समोर आले आहे. फारुखाबादमध्ये एक अनोखा प्रकार समोर आला आहे, जिथे एक लहान मुलगा चावल्याने चक्क सापाचा मृत्यू झाला आहे. खेळत असताना अडीच वर्षांच्या मुलाने सापाला तोंडात पकडून दाताने चावले, त्यामुळे साप जागीच मरण पावला. मुलाच्या आजीला ही बाब कळताच तिने ताबडतोब त्याला रुग्णालयात नेले व तिथे त्याच्यावर उपचार केले गेले. हे संपूर्ण प्रकरण फारुखाबाद जिल्ह्यातील कोतवाली मोहम्मदाबाद भागातील आहे. इथे मदनापूर गावातील रहिवासी दिनेश यांचा अक्षय हा अडीच वर्षांचा मुलगा घराच्या अंगणात खेळत होता. तेवढ्यात कुठूनतरी अंगणात एक सापाचे पिल्लू अक्षयच्या जवळ आले. अक्षयही त्याच्यासोबत खेळू लागला. खेळताना अक्षयने सापाला तोंडात पकडून दातांनी चावले. त्यामुळे साप रक्तबंबाळ झाला व त्यात त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा: घराच्या दारात पडून असलेल्या सापाच्या हल्ल्यापासून थोडक्यात बचावली लहान मुलगी; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)