नागपूर येथील वाठोडा परिसरतील शैलेस नगर येथील दोन सापांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल जाला आहे. ज्यामध्ये हे दोन्ही साप परस्परांच्या शरीराला वेटोळे घालून, नृत्य करताना दिसत आहे. अर्थात, पाहणाऱ्यास हे नृत्य वाटत असले तरी, ते त्यांचे नैसर्गिक मिलन आहे. या प्रकारास साप परस्परांशी समागम करत असतात. नागरी वस्तीमध्ये या दोन वन्य जीवांचे मिलन सुरु झाल्याने स्थानिक नागरिकांनी या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रीकरण केले आणि ते सोशल मीडियावर अपलोड केले. अल्पावधीच ते व्हायरल झाले.
हाच तो सर्पमिलनाचा क्षण
Snake Mating Dance: A video of two snakes mating was captured in Shailesh Nagar, Wathoda, Nagpur, on Sunday, May 11. Locals were shocked to witness the rare sight in public view. Many recorded videos and shared them on social media platforms, where the footage quickly went viral. pic.twitter.com/1PiKg6bsZa
— nagpurnews (@nagpurnews3) May 11, 2025
स्थानिकांनी आकर्षक आणि धक्कादायक असे वर्णन केलेल्या या कार्यक्रमात, साप अनेकदा समागम कृतींशी संबंधित समन्वित हालचाली करताना पाहायला मिळाले. हे वीण नृत्य सापांमध्ये प्रणय प्रक्रियेचा एक भाग म्हणून ओळखले जाते, जिथे कधीकधी दोन नर एका मादीसाठी स्पर्धा करतात किंवा एक नर एका समक्रमित पद्धतीने वर येऊन एका मादीला प्रणय करतो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)