ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई वाढून 6.21% झाली, जी मागील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये 5.49% होती. मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, महागाई दर वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती हे आहे. अशाप्रकारे, किरकोळ महागाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सहा टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या वर गेली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई दर 4.87 टक्के होता. सरकारने चलनवाढ चार टक्के (दोन टक्क्यांच्या चढ-उतारात) ठेवण्याची जबाबदारी सेंट्रल बँकेला दिली आहे. वाढत्या महागाईमुळे आरबीआय व्याजदरात कपात करण्याची शक्यता पुन्हा एकदा मावळली आहे. गेल्या महिन्यात आरबीआयने पॉलिसी रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, ऑक्टोबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई वाढून 10.87 टक्के झाली होती, जी सप्टेंबरमध्ये 9.24 टक्के आणि वर्षभरापूर्वी याच महिन्यात 6.61 टक्के होती. ग्रामीण भागातील चलनवाढही सप्टेंबरमधील 5.87 टक्क्यांवरून 6.68 टक्क्यांवर पोहोचली, तर शहरी चलनवाढ मागील महिन्यात 5.05 टक्क्यांवरून 5.62 टक्क्यांवर पोहोचली. विशेषत: कांद्याच्या दरात झालेली वाढ चिंताजनक आहे. कांद्याचे घाऊक भाव 40 ते 60 रुपये किलोवरून 70 ते 80 रुपये किलो झाले आहेत. (हेही वाचा: Onion Prices: दिल्ली, मुंबईसह देशभरात कांद्याचे दर गगनाला भिडले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले)

India’s Retail Inflation:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)