गंगा नदी ही भारताची मोक्ष नदी मानली जाते. मरणासन्न माणसाच्या तोंडात गंगेच्या पाण्याचा एक थेंब पडला तर त्याला मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात. मात्र या पवित्र गंगेच्या पाण्यावर वस्तू आणि सेवा कर किंवा जीएसटी लागू असल्याबाबत चर्चा सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेले ट्विट याच दिशेने निर्देश करते. त्या ट्विटमध्ये त्यांनी गंगाजलावर 18 टक्के जीएसटी लावण्यात आल्याचे सांगितले आहे. आता केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) स्पष्ट केले आहे की 'गंगाजल'ला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. गंगाजलला आधीच जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले होते. गंगाजलावर 18% जीएसटी लादल्याच्या दाव्यांदरम्यान, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने स्पष्टीकरण जारी केले आहे की, गंगाजल आणि इतर पूजा साहित्यांवर कोणताही जीएसटी आकारला जात नाही. अशाप्रकारे गंगाजलावर जीएसटी लावण्याच्या वृत्ताचे सरकारने खंडन केले आहे. मे 2017 आणि जून 2017 मध्ये जीएसटी कौन्सिलच्या 14 व्या आणि 15 व्या बैठकीत यावर तपशीलवार चर्चा झाली आणि त्यानंतर पूजा साहित्य जीएसटीच्या कक्षेबाहेरच ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. (हेही वाचा: निवडणूकीच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी मध्य प्रदेश दौऱ्यावर, मंडला मंदिरात केली पूजा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)