GST Collection: लोकसभा निवडणुकीदरम्यान भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सरकारने एप्रिल 2024 साठी जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे आणि ती विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. नवीन आर्थिक वर्षात जीएसटी संकलनाच्या बाबतीत देशाने इतिहास रचला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर प्रथमच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन आतापर्यंतचे सर्वाधिक 2.10 लाख कोटी रुपये आहे. तसेच एप्रिल महिन्यात वार्षिक आधारावर एकूण महसुलात 12.4 टक्के वाढ नोंदवली आहे. याशिवाय, निव्वळ महसूल (परताव्यानंतर) 1.92 लाख कोटी रुपये आहे आणि तो वर्षानुवर्षे 17.1 टक्क्यांनी वाढला आहे. एप्रिल 2024 च्या एकूण जीएसती संकलनामध्ये केंद्रीय जीएसटी (CGST) 43,846 कोटी रुपये,. राज्य जीएसटी (SGST) 53,538 कोटी रुपये, आयजीएसटी (IGST) 99,623 कोटी रुपये उपकर 13,260 कोटी रुपये यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Rule Change From 1st May: LPG Cylinder पासून Saving Account मध्ये झाले 'हे' मोठे बदल; तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)