Raid 2 Collection Day 1: अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रेड 2’ अखेर गुरुवारी 1 मे रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. ज्यामुळे चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले होते. ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘रेड 2’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 19.71 कोटी रुपये कमावले आहेत. सिनेमागृहांमध्ये ‘रेड 2’ ला प्रेक्षकांकडून मोठा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशीच ‘रेड 2’ ने मोठे कलेक्शन केले (Raid 2 Collection) आहे. ‘रेड 2’ हा 2018 मधील सुपरहिट चित्रपट ‘रेड’चा सिक्वेल आहे. गुरुवारी संजय दत्तचा ‘द भूतनी’, दाक्षिणात्य चित्रपट ‘रेट्रो’ व ‘हिट ३’ आणि हॉलीवूडचा ‘थंडरबोल्ट’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. त्याशिवाय, ‘केसरी २’ आणि ‘जाट’ दोन्ही चित्रपटही थिएटर्समध्ये आहेत. या सर्वांना मात देत ‘रेड 2’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आहे. ‘रेड 2’ ने प्री-तिकीट सेलमध्ये सुमारे 10 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.
अजय देवगणच्या Raid 2 ची धमाकेदार सुरुवात
#Raid2 does the Job.. Collects huge 19.71 Crs on opening day.... pic.twitter.com/ERtLbiejH0
— Always Bollywood (@AlwaysBollywood) May 2, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)