दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी आज सकाळी सीबीआयची टीम पोहचली आहे. सीबीआय च्या कारवाई नंतर सिसोदीया यांनी काही ट्वीट करत 'स्वागत आहे आम्ही कट्टर ईमानदार' असं म्हटलं आहे. यापूर्वीही अशा धाडी टाकण्यात आल्या होत्या तेव्हाही काही मिळालं नाही आणि आताही काही मिळणार नाही असेही त्यांनी म्हटलं आहे. excise policy case मध्ये 21 विविध ठिकाणी दिल्ली,एनसीआर मध्ये धाडी टाकल्या जात आहेत त्यामध्ये सिसोदियांच्या घराचाही समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)