या देशामध्ये पैशांची कमतरता अजिबात नाही. पण, देशासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांची मात्र या देशात कमतरता असल्याचे नितीन गकरी यांनी म्हटले आहे. ते चंदीगड येथे बोलत होते. ते म्हणाले मला 1995-2000 मध्ये खूप चांगला अनुभव आला. मी मुंबईत मंत्री होतो, तुम्ही कधी मुंबईला गेलात तर वरळी-वांद्रे सी लिंक आहे, तो बनवण्याचे सौभाग्य मला लाभले. मला आठवते आम्ही 600 कोटी रुपयांसाठी पहिल्यांदा मार्केटमध्ये गेलो होतो आणि आम्हाला 1150 कोटी रुपये मिळाले आणि त्या अनुभवाने मला शिकवले की देशात पैशाची कमतरता नाही, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Nitin Gadkari: नितीन गडकरी यांना यवतमाळ येथील सभेत भोवळ, विश्रांती घेऊन पुन्हा दमदार भाषण)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)