आसाम मध्ये धुबरी जिल्ह्यात एका हत्तीने 30 वर्षीय व्यक्तीवर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये असे दिसून येत आहे की, हत्तीच्या पुढे दोन व्यक्ती जोराने धावत आहेत. परंतु त्यामधील एक व्यक्ती धावताना खाली पडतो आणि पाठून येत असलेला बलाढ्य हत्ती त्याच्यावर हल्ला करतो. या प्रकरणी जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार जंगलाच्या ठिकाणी झाल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)