युजीसीने सर्व शैक्षणिक संस्थांनी डिजिलॉकर प्लॅटफॉर्मवरील विद्यार्थ्यांची पदवी, गुणपत्रिका आणि अन्य शैक्षणिक कागदपत्र वैध मानावीत असे शुक्रवारी म्हटले आहे. यूजीसीने म्हटले आहे की भारतात अनेक राज्य तसेच केंद्रीय शिक्षण मंडळे आहेत जी डिजिटल कागदपत्रे पुरवत आहेत. अगदी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) आणि अनेक विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांनी डिजिटल कागदपत्रे जसे की प्रमाणपत्रे, हस्तांतरण प्रमाणपत्रे प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. डिजीलॉकर प्लॅटफॉर्मवर जारी केलेली पदवी, गुणपत्रिका यासारखी शैक्षणिक कागदपत्रे वैध कागदपत्रे आहेत.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)