Digital Documents Now Valid in Mumbai: मुंबईकरांना दिलासा! आता DigiLocker आणि mParivahan ॲप्सवरील कागदपत्रे धरली जाणार ग्राह्य; वाहतूक पोलिसांना दिले निर्देश

केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांनी वाहन चालक अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची डिजीटल कॉपी Digi Locker व mParivahan या मोबाईल अॅपद्वारे दाखविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे.

Digital Documents Now Valid in Mumbai: मुंबईकरांना दिलासा! आता DigiLocker आणि mParivahan ॲप्सवरील कागदपत्रे धरली जाणार ग्राह्य; वाहतूक पोलिसांना दिले निर्देश
Image For Representation (Photo Credits-Facebook)

Digital Documents Now Valid in Mumbai: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बाब आहे. आता डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहे. याबाबतचे आदेश मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. सध्याच्या डिजिटल युगात अनेक वाहन चालक त्यांना जारी करण्यात आलेले अनुज्ञप्ती, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहनाचा विमा, पी.यु.सी. यांची डिजीटल कॉपी डिजी लॉकर (Digi Locker) अॅप किंवा एम परिवहनवर ठेवतात. मात्र असे निदर्शनास येत आहे की, काही पोलीस अधिकारी कर्तव्यादरम्यान वाहन मालक किंवा चालक यांनी डिजी लॉकर किंवा एम परिवहनवरील ही कागदपत्रे दाखवून सुध्दा त्यांच्यावर ई-चलान कारवाई करित आहेत. याबाबत अनेक तक्रारी कार्यालयाला प्राप्त होत होत्या.

केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांनी वाहन चालक अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची डिजीटल कॉपी Digi Locker व mParivahan या मोबाईल अॅपद्वारे दाखविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता मोबाईल अॅपद्वारे सदर कागदपत्रे दाखविल्यास ती ग्राह्य धरण्यात यावीत, असे लेखी आदेश वाहतूक सहपोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे आता मुंबईकर मोटरगाडी आणि दुचाकीच्या प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी डिजिलॉकर अ‍ॅपच्या मदतीने वाहतूक पोलिसांना कागदपत्रे दाखवू शकतात. (हेही वाचा: Mumbai-Navi Mumbai Travel via Atal Setu: आता अटल सेतूमार्गे मुंबई ते नवी मुंबई प्रवास झाला स्वस्त; NMMT ने भाड्यात केली 50 टक्के कपात, जाणून घ्या नवे दर)

Digital Documents Now Valid in Mumbai:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).