आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईमधील अटल सेतूच्या माध्यमातून मुंबई ते नवी मुंबईदरम्यान धावणाऱ्या एसी बससेवेच्या भाड्यात 50 टक्क्यांहून अधिक कपात करण्यात आली आहे. आता खारघर ते मंत्रालयाचे भाडे 270 रुपयांवरून 120 रुपये आणि नेरूळ ते मंत्रालयाचे भाडे 230 रुपयांवरून 105 रुपये झाले आहे. एनएमएमटीच्या बसेस जवळपास रिकाम्या धावत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. एनएमएमटीच्या म्हणण्यानुसार, भाडे कमी केल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली आहे. मार्ग क्रमांक 116 वर प्रवाशांची संख्या 20 वरून 60 आणि मार्ग 117 वर 20-25 वरून 70 पर्यंत वाढली आहे.
सप्टेंबर 2023 मध्ये गणेशोत्सवादरम्यान सुरू झालेल्या या बस सेवा मुंबई-नवी मुंबईला अटल सेतूद्वारे जोडण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आल्या होत्या. अटल सेतू, भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू असून, त्याद्वारे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास 20 मिनिटांत पूर्ण होतो. मात्र जास्त टोल आणि महागडे भाडे यामुळे ही सेवा फोल ठरली. (हेही वाचा: Pune Metro Update: पुणेकरांनो लक्ष द्या! समोर आले शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोबाबत अपडेट, जाणून घ्या कधी सुरु होणार)
Mumbai-Navi Mumbai Travel via Atal Setu -
#NewsNow | Mumbai to Navi Mumbai travel set to get cheaper
50% cheaper fares for NMMT passengers on Atal Setu; which routes will see reduced ticket rates?
@shwetaa_verma #AtalSetu @nmmtonline pic.twitter.com/4aoyri3o9M
— ET NOW (@ETNOWlive) January 3, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)