Viral Video: नवी मुंबई महानगरपालिका परिवहन (NMMT) बससह 4 वाहनांचा शनिवारी सकाळी अपघात झाला. ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर भांडुपमध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. अपघातस्थळाचे व्हिज्युअल इंटरनेटवर समोर आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी आज सकाळी पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये अपघाताची माहिती शेअर केली. या घटनेची माहिती देताना, मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विट केले की, कांजूर मार्ग, भांडुप तलाव येथे चार वाहनांच्या अपघातामुळे दक्षिणेकडील वाहतूक वाहनांची गती मंदावली आहे.
#Mumbai: An #accident took place on Saturday morning involving 4 vehicles, including an NMMT bus. The incident took place in #Bhandup on the #EasternExpressway. Southbound traffic vehicular movement was affected after the incident. pic.twitter.com/cLA0Mo2cAW
— Free Press Journal (@fpjindia) August 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)