UGC-NET June 2024 Examination Cancelled: युजीसी-नेट (UGC-NET) परीक्षेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयाने युजीसी-नेट 2024 परीक्षा रद्द केली आहे. परीक्षेतील अनियमिततेच्या तक्रारी समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे शिक्षण मंत्रालयाने सांगितले. परीक्षेतील अनियमिततेचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 18 जून 2024 रोजी देशातील विविध शहरांमध्ये युजीसी-नेट जून 2024 परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत हेराफेरीचे आरोप झाले होते. निवेदनानुसार, परीक्षा प्रक्रियेची सर्वोच्च पातळी पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने युजीसी-नेट जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन परीक्षा घेतली जाईल, ज्याची माहिती स्वतंत्रपणे सामायिक केली जाईल. (हेही वाचा: NEET Controversy: गुजरात पोलिसांकडून Godhra Examination Centre वर राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा मध्ये गैरव्यवहार प्रकरणी 5 जणांना केली अटक; 27 जणांना उत्तीर्ण करण्यासाठी घेतले होते 10 लाख)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)