CSIR-UGC-NET Examination June 2024 Postponed: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने युजीसी नेट जून 2024 नंतर, आता आज CSIR UGC NET परीक्षा 2024 पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. 21 जून रोजी जारी केलेल्या अधिकृत नोटीसमध्ये, एजन्सीने जाहीर केले की, 25 ते 27 जून दरम्यान होणारी सीएसआयआर-यूजीसी-नेट परीक्षा पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. एनटीएनुसार, अपरिहार्य परिस्थितीमुळे तसेच लॉजिस्टिक समस्यांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीएसआयआर-यूजीसी-नेट  2024 साठी नोंदणी प्रक्रिया 1 मे 2024 रोजी सुरू केली होती. यासाठी नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना 27 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. (हेही वाचा: महाराष्ट्रात MH CET परीक्षेमध्येही गोंधळ झाल्याचा म्हणत आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे मार्क्स टॉपर्स जाहीर करण्याची केली मागणी)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)