महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा एचएससी चा निकाल कमी लागला आहे. पण आता तुम्हांला निकाल पाहण्याची उत्सुकता वाढली असेल. यावर्षी देखील बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच अन्य थर्ड पार्टी साईट्सवर देखील निकाल पाहता येणार आहे. आज जाहीर झालेला बारावीचा निकाल एबीपी माझाच्या वेबसाईट वर देखील पाहण्याची सोय आहे. त्यासाठी mh12.abpmajha.com वर तुम्हांला रोल नंबर आणि आईचं नाव टाकून निकाल पाहता येईल. Maharashtra Board 12th Result Declared: यंदा बारावीचा निकाल घसरला, 91.25% विद्यार्थी उत्तीर्ण; दुपारी 2 वाजता mahresult.nic.in वर पहा गुणपत्रिका!
12वीचा ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी काय कराल?
ऑल द बेस्ट!👍🏻
आज बारावीचा निकाल; 🎓दुपारी दोन वाजल्यापासून
निकाल पाहण्यासाठी ...
या लिंकवर क्लिक करा...#HSC#HSCResult#HSCResult2023#HSCResultOnMajhapic.twitter.com/t4gFKOKjgC
— ABP माझा (@abpmajhatv) May 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)