Maharashtra HSC Result 2024 Date: यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. अहवालानुसार उद्या, म्हणजेच मंगळवारी दिनांक 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. गेले अनेक दिवस विद्यार्थी व पालकांना या निकालाची उत्सुकता होती. यावर्षी, महाराष्ट्र मंडळातर्फे 2 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत 12वी बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थी उद्या https://mahahsscboard.in/mr किंवा mahresult.nic.in या वेबसाईटवर त्यांचे निकाल तपासू शकतात. मागील वर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात आला होता, तर 10 वी चा निकाल 2 जूनला लागला होता.  (हेही वाचा: Child Marriage: बालविवाह रोखल्याने तिच्या आयुष्यात नवा प्रकाश; केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेही घेतली दखल; वाचा सविस्तर)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)