Maharashtra Hsc Board Exam 2024: बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. यंदा १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. दरम्यान, परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका वितरित करण्यापासून ते प्रश्नपत्रिकेचे ताब्यात घेईपर्यंत सगळ चित्रित केले जाणार आहे. प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिका घेऊन जाणाऱ्या वाहतुकीला जीपीएस लावण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रा जवळील झेरॉक्सचे दुकानही बंद राहणार आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान होत आहे.
बोर्डाचं कॉपीमुक्त अभियान, दहावी बारावी परीक्षेदरम्यान केंद्राजवळील झेरॉक्स दुकानं बंद ठेवणार.
-#SSC #HSC #Exam #copy #LetsuppMarathi pic.twitter.com/YLOsueCXyC
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) February 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)