सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) परीक्षा बुधवार, 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. मात्र, मुख्य विषयांच्या परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. आता 2023 च्या सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या एक दिवस आधी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने चॅटजीपीटीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. या वर्षी तुम्ही सीबीएसई 10वी किंवा 12वीची परीक्षा देणार असाल तर चुकूनही परीक्षेत चॅट जीपीटी वापरण्याचा विचार करू नका.

मंगळवार, 14 फेब्रुवारी रोजी सीबीएसईने सांगितले की 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षांमध्ये चॅट जीपीटीचा वापर करण्यास मनाई आहे. परीक्षेच्या हॉलमध्ये चुकूनही विद्यार्थ्यांनी मोबाईल किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाऊ नये. अशा गोष्टींसोबत पकडले गेल्यास कडक कारवाई केली जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)