Viral Video: शहापूरमध्ये रेड्याच्या वाढदिवानिमित्तच्या जंगी पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Viral Video: प्राण्यांचे सध्या वाढदिवस साजरा करण्याचा नवे खुळ लोकांना लागले आहे. त्यामुळे आपण माणसे जसा आपला वाढदिवस साजरा करतो त्याचप्रमाणे आता प्राण्यांच्या वाढदिवसाची प्रथा सुरु झाली आहे, अशातच सोशल मीडियात एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क एका रेड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यासाठी जंगी पार्टीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.(Viral Video: विशालकाय अजगरासोबत मुक्तपणे खेळणाऱ्या मुलीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का? Watch It)

व्हायरल झालेला व्हिडिओ हा शहापूर मधील सापगावातील आहे. येथील सुरेश महादू अंदाडे यांच्या रेड्याचा वाढदिवस साजरा केला गेला. तर रेड्याने याआधी खुप झुंजी जिंकून प्रसिद्धी सुद्धा मिळवली आहे. त्यामुळे त्याच्या वाढदिवसानिमित्त खास सेलिब्रन ठेवण्यात आले. तर वाढदिवसाला गावातील मंडळींना आमंत्रित करत मटणाचा बेत ठेवत केक सुद्धा कापला गेला. या रेड्याच्या वाढदिवसाची सध्या जोरदार चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.(Bear vs Tiger Viral Video: अस्वल आणि वाघ यांच्यात जोरदार लढाई, कोण जिंकले? पाहा व्हिडिओ)

सुरेश महादू अंदाडे यांनी रेड्याचे नाव रामू असे ठेवले आहे. तर प्रत्येक वर्षी अशाच जल्लोषात रामू याचा वाढदिवस साजरा केला जात असल्याचे अंदाडे यांनी सांगितले. वाढदिवसाच्या निमित्त रामू याची गावात जंगी मिरवणूक ते संपूर्ण गावाला चिकन-मटणाचा बेत दिल्याने मंडळी सुद्धा आनंदित असल्याचे दिसून आले.