Viral: वकिलाची Constitution Theme असणारी लग्नपत्रिका सोशल मीडियात व्हायरल
प्रतिकात्मक फोटो ( फोटो सौजन्य - Pixabay)

Viral: लग्नाला आप्तेष्टांना आमंत्रित करण्यासाठी लागणारी पत्रिका अगदी हटके असावी असा सध्या ट्रेन्ड सुरु आहे. अशातच उत्तर प्रदेशातील एका कपलने आपल्या लग्नपत्रिकेवर QR कोड दिला होता. त्याच माध्यमातून त्यांना भेट म्हणून पैसे द्यायचे असतील तर ते द्यावेत असे सांगण्यात आले होते. परंतु आता सध्या सोशल मीडियात एक लग्नपत्रिका तुफान व्हायरल होत आहे. या लग्नपत्रिका ही 'संविधान थीम' ची (Constitution Theme) आहे.

गुवाहाटी येथील वकील अजय सरमा याने आपल्या लग्नाची पत्रिका ही भारताच्या संविधानाप्रमाणे छापली आहे. त्यावर समानतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी न्यायाचा तराजू दाखवला असून त्यावर नववधू आणि वराचे नाव लिहिले आहे. त्याचसोबत लग्नासंबंधित भारतात असलेले नियम आणि हक्क त्यांचा सुद्धा उल्लेख लग्नपत्रिकेत केला आहे.(Desi Jugaad Bullet Video: विनापेट्रोल चालणारी बुलेट, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यालाही फायदा; पाहा व्हिडिओ)

Tweet:

भारताच्या संविधानानुसार कलम 21 अंतर्गत योग्य लग्न म्हणजे उत्तम आयुष्य असे म्हटले आहे. त्यामुळे या मूलभूत हक्काचा येत्या 28 नोव्हेंबरला मी वापर करणार असल्याचे वकिलाने आपल्या लग्नपत्रिकेत म्हटले आहे. पुढे असे म्हटले आहे की, जेव्हा वकिल लग्न करतात तेव्हा ते 'हो' (YES) असे म्हणत नाहीत. उलट आम्हाला नियम आणि अटी मान्य असल्याचे म्हणतात.(ऐकाव ते नवलच ! अहमदाबादमध्ये एका व्यक्तीने बनवला पान आणि ब्राउनीचा कॉम्बो, व्हिडीओ पाहून लोकांचा राग अनावर, केल्या भन्नाट कमेंट Watch Video )

सोशल मीडियात यांची लग्नपत्रिका व्हायरल झाल्याने युजर्सने विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटले की, त्यांनी CLAT चा अर्धा अभ्यासक्रम लग्नपत्रिका वाचल्यानंतर पूर्ण केला आहे. तर काहींनी ही लग्नपत्रिका पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.

एका युजरने म्हटले की, वाचून असे वाटते की समन्स धाडले आहेत. तर दुसऱ्याने म्हटले, त्याने आपल्या नावापुढे वकिल लिहिण्यास विसरला वाटतं. त्याचसोबत पंडित ऐवजी आता न्यायाधीश यांनाच लग्न करण्याासाठी बसवावे असे ही युजरसने म्हटले आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात कोलकाता येथील एका कपलनेलग्नताली मेन्यूसाठी आधार कार्डची थीम वापरली होती. त्यामध्ये स्टारर्ट्स, मेन कोर्स आणि डेजर्ट्सचा समावेश होता. पुढे असे ही स्पष्ट केले होते की, हे फक्त आजच्या दिवसासाठी वॅलिड असणार आहे.