ऐकाव ते नवलच ! अहमदाबादमध्ये एका व्यक्तीने बनवला पान आणि ब्राउनीचा कॉम्बो, व्हिडीओ पाहून लोकांचा राग अनावर, केल्या भन्नाट कमेंट  ( Watch Video )
Brownie Paan ( Photo- Twitter)

देशात विचित्र रेसिपी बनवण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. काही दिवसांपूर्वी, अहमदाबादमधील एका स्ट्रीट फूड स्टॉलने ओरियो बिस्किट पकोडे सर्व्ह करून नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले होते. आता अहमदाबादमधून पान आणि चॉकलेट ब्राउनीच्या कॉम्बोचा (Paan and Brownie combo)एक विचित्र रेसिपी व्हिडिओ समोर आला आहे, जो ट्विटरवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तो बनवणाऱ्याला शिव्या देत आहेत. (सोशल मिडीयावर व्हायरल होतोय 'रसगुल्ला चाट' यूजर्स ने केल्या मजेशीर कमेंट (Watch Video )

आजकाल बहुतेक खाद्यपदार्थ किंवा स्टॉल मालकांना ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी खाद्यपदार्थांवर प्रयोग करायला आवडतात. काहीवेळा या प्रयोगांमुळे अन्न आणखी स्वादिष्ट बनते. मात्र कधी-कधी हे दुकानदार असे काही करतात, जे पाहिल्यानंतर लोकांचा राग अनावर होतो. सध्या पान आणि ब्राउनीचा एक विचित्र कॉम्बिनेशन व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याबद्दल यूजर्स प्रचंड संतापले आहेत. पहा व्हिडिओ.

 

 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती तव्यावर छोटी प्लेट गरम करत आहे. यानंतर त्यावर चॉकलेटचे द्रावण टाकतो मग त्या सोल्युशनमध्ये ब्राउनी ठेवून त्यावर एक आइस्क्रीमठेवतो . यानंतर, व्यक्ती पान बनवते आणि आईस्क्रीमवर पसरवते. पानाची ही अजब रेसिपी पाहून लोकांना खूप राग येतो. तुम्हाला आवडली का ही रेसिपी ?