Desi Jugaad Bullet Video: विनापेट्रोल चालणारी बुलेट, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यालाही फायदा; पाहा व्हिडिओ
Desi Jugaad Bullet Video | (Photo Credit - Instagram)

वाढती महागाई (Inflation) आणि इंधनाचे दर (Fuel Rate) सर्वामान्यांसमोर एक जटील प्रश्न बनला आहे. त्यामुळे वाढत्या महागाईपासून बचाव करण्यासाठी देशातील काही हुन्नरी मंडळी वेगवेगळ्या कल्पना राबवत आहे. एका तरुणाने असेच एक देसी जुगाड (Desi Jugaad) केले आहे. या तरुणाने चक्क इकोफ्रेंडली बुलेट बनवली आहे. कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल पण या तरुणाच्या बुलेटचा व्हिडिओ पाहाल तर तुम्ही थक्क व्हाल. इतकेच नव्हे तर तुम्हाला हसूही आवरणार नाही कदाचित. सोशल मीडियावर अनेकांनी या व्हायरल व्हिडिओ (Viral Video) चे कौतुक केले आहे. तर अनेकांनी त्यावर टीका केली आहे. पण, वास्तवता पाहिली तर देशातील महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमती पाहता असे काही जुगाडच (Desi Jugaad Bullet Video) सर्वसामान्यांचा बचाव करु शकते, असेही काही लोक विनोदाने म्हणतात.

व्हिडिओत पाहायला मिळते की, एका तरुणाने चक्क सायलललाच बुलेटचा लुक दिला आहे. इतकेच नव्हे तर त्याने हँडलच्या ठिकाणी थेट स्टेअरींगच लावले आहे. इन्स्टाग्रामवर @upcopmanish या नावाने सुरु असलेल्या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सायकलवर बुलेट चालवल्याचा फिल घेत हा तरुण रस्त्यावर मजेत निघाला आहे. एक महिलाही पाठिमागच्या शीटवर बसलेली दिसते. ही महिला या तरुणाची पत्नी असल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा, Make in India: देसी जुगाड सोशल मीडियावर VIDEO VIRAL; पुणे येथे आत्मनिर्भर शिक्षिकेचा Online Class)

इन्स्टा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by kunal Diwakar (@upcopmanish)

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत सोपत कॅप्शन लिहिली आहे की, 'शौक जुगाड से भी पुरे किए जा सकते है, पुरे न सही कुछ हद तक तसल्ली तो मिल ही जाएगी'. इंटरनेटवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आपणही व्हिडिओवर क्लिक करुन हे देसी जुगाड पाहू शकता.