Kartik Aaryan: आपल्या आवडत्या कलाकारासाठी चाहत्यांच्या वेडाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण सध्या अशाच एका वेड्या चाहत्याचे प्रकरण समोर आले आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) च्या चाहत्याने त्याला भेटण्यासाठी 1100 किलोमीटरचा सायकल (Bicycle) प्रवास केला आणि अभिनेत्याची भेट घेतली. या प्रकरणाचा एक ताजा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे.
'भूल भुलैया 2' या हॉरर कॉमेडी चित्रपटातून सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या कार्तिक आर्यनच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अशातचं आता कार्तिकच्या चाहत्याचे अभिनेत्यावरील प्रेम आणि वेड पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (हेही वाचा -शहजादा स्टार Kartik Aaryan ने आपल्या लॅम्बोर्गिनी गाडीसाठी भरले चालान; Mumbai Traffic Police म्हणतात- 'कोणीही नियमांची पायमल्ली करू शकत नाही')
फोटोग्राफर वरिंदर चावलाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कार्तिक आर्यनचा हा चाहता दिसेल, ज्याने आपल्या आवडत्या कलाकार कार्तिक आर्यनला मुंबईतील त्याच्या घरी भेटण्यासाठी उत्तर प्रदेशातील झाशीपासून सुमारे 1100 किलोमीटर सायकलचा प्रवास केला. या चाहत्याने झांशी ते मुंबई हा प्रवास जवळपास 9 दिवसात पूर्ण केला आहे.
पहा व्हिडिओ -
View this post on Instagram
कार्तिकला या प्रकरणाची माहिती मिळताच तो ताबडतोब घराबाहेर पडला आणि त्याने या चाहत्याची भेट घेतली. यादरम्यान अभिनेत्यानेही त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि त्याला मिठी मारली. कार्तिक आणि त्याच्या फॅन्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (Kartik Aaryan Visits Lalbaugcha Raja: गणेश चतुर्थीला 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी पोहोचला कार्तिक आर्यन, See Photos)
तथापी, पती-पत्नी और वो, सत्य प्रेम की कथा आणि भूल भुलैया 2 यांसारख्या चित्रपटातून चाहत्यांचे मनोरंजन करणारा कार्तिक आर्यन येत्या काळात चंदू चॅम्पियन या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध हिंदी चित्रपट निर्माते कबीर खान करत आहेत.