Kartik Aaryan Visits Lalbaugcha Raja: गणेश चतुर्थीला 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी पोहोचला कार्तिक आर्यन, See Photos
कार्तिकने गणेशमूर्तीसमोर चाहत्यांसाठी पोजही दिली. कार्तिक आपल्या आई-बाबासह बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला होता.
Kartik Aaryan Visits Lalbaugcha Raja: गणेश चतुर्थी 2022 निमित्त देशभरात गणपती उत्सव साजरा होत आहे. आजपासून पुढील 10 दिवस घरोघरी गणेशाची पूजा केली जाणार आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलेब्सही या रंगात रंगले आहेत. अशा परिस्थितीत अभिनेता कार्तिक आर्यन गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे मुंबईतील सर्वात मोठ्या गणपती बाप्पाच्या म्हणजेच लालबागच्या दरबारात पोहोचला. कार्तिकने बाप्पाचे दर्शन घेतले. त्याने लालबागच्या राजाचे दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यावेळी कार्तिक आर्यन (Karthik Aryan) पारंपरिक लूकमध्ये दिसला. यावेळी अभिनेत्याने फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
कार्तिकने गणेशमूर्तीसमोर चाहत्यांसाठी पोजही दिली. कार्तिक आपल्या आई-बाबासह बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला होता. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर कार्तिकने लहान मुलांसह चाहत्यांसोबत पोज दिली. (हेही वाचा - Rinku Rajguru Photoshoot On Ganesh Festival: रिंकू राजगुरुने ढोल, ताशाच्या गजरात केली गणपती बाप्पाची पूजा; पहा अभिनेत्रीचा मराठमोळा लूक, Watch Video)
View this post on Instagram
कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले दर्शनाचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, अनीस बज्मीच्या भूल भुलैया 2 मध्ये कार्तिकने कियारा अडवाणी आणि तब्बूसोबत अभिनय केला. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली. आता कार्तिक आर्यंन क्रिती सेननसोबत शेहजादा चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. रोहित धवन दिग्दर्शित हा चित्रपट अला वैकुंठापुरमुलू या तेलगू चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2022 12:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

