Rare Two-Headed Cobra Spotted in Dehradun: उत्तराखंड मधील देहरादून येथे कालसी वन विभागाकडून एका दुतोंडी दुर्मिळ कोब्रा सापाची सुटका करण्यात आलेली आहे. सर्पमित्र आदिल मिर्झा याने असे म्हटले की, त्यांना विकास नगर परिसरातील इंडस्ट्रीयल येथे एक लहान कोब्रा आढळून आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहचले असता तेव्हा दीड फुट लांब आणि दुतोंडी कोब्रा त्यांना दिसला.(साप चावल्याने संतप्त झालेल्या व्यक्तीने केले 'हे' विचित्र कृत्य, वाचा नक्की काय घडले)
कालसी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मिर्झा याला याबद्दल सांगितले आणि त्याची सुटका करण्याच्या सुचना दिल्या. 15 वर्षाच्या साप पकडण्याच्या कामात आजवर अशा प्रकारचा साप पाहिलाच नव्हता. हा अत्यंत दुर्मिळ साप आहे. याबद्दल मिर्झा याने टाइम्स इंडिया सोबत बोलताना सांगितले आहे. त्याने पुढे असे ही म्हटले की, तो साप दोन आठवड्यांपेक्षा कमी दिवसांचा आहे.
वनविभागाकडून दुतोंडी कोब्राला देहरादून मधील रेक्स्यू सेंटरमध्ये पाठवले आहे. तेथे त्याची चाचणी केली जाणार आहे. डॉक्टरांनी पाहिल्यानंतर या सापाला अभ्यासासाठी ठेवायचे की त्याला सोडून द्यायचे याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. अशा प्रकारचे साप हे जंगलात अत्यंत कमी दिवस जगू शकतात. दुतोंडी कोब्रा हे अत्यंत दुर्मिळ जातींपैकी एक आहे.(झाडावरुन खाली उतरणाऱ्या बिबट्यावर लोकांची विनाकारण दगडफेक, सोशल मीडियात युजर्सकडून संताप व्यक्त Watch Viral Video)
उत्तराखंड येथे साप दिसणे ही एक अत्यंत साधी गोष्टी आहे. याआधी वाईल्डलाइफ इंस्टिट्युट ऑफ इंडिया आणि फॉरेस्ट रिसर्च इंस्टिट्युट, देहरादून यांनी पुष्टी केली होती की, दुर्मिळ Black Bellied कोरल सापाचा एक लहान परिवार राज्यात सापडला होता. हा दुर्मिळ कोब्रा नैनिताल आणि मसूरी येथे आढळला होता.