साप चावल्याने संतप्त झालेल्या व्यक्तीने केले 'हे' विचित्र कृत्य, वाचा नक्की काय घडले
फोटो सौजन्य- Pixabay

Odisha: ओडिशाच्या एका गावात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. जजपुर जिल्ह्यातील गंभारीपतिया गावात घडलेल्या विचित्र घटनेमुळे सर्वांना त्याच्यावर विश्वास ठेवणे अशक्य झाले आहे. कारण खरंच असे काही होऊ शकते का याचा विचार सर्वांकडून केला जात आहे. खरंतर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने विषारी सापाला चावले. त्यानंतर व्यक्तीने सापाला ठार मारण्याचे ठरवलेच आणि त्याला कापून मारले. तर जाणून घ्या नेमके या घटनेत या घडले.(झाडावरुन खाली उतरणाऱ्या बिबट्यावर लोकांची विनाकारण दगडफेक, सोशल मीडियात युजर्सकडून संताप व्यक्त Watch Viral Video)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सापाला मारणाऱ्या व्यक्तीच्या नावाची ओळख बदरा अशी झाली आहे. बुधवारी रात्री जेव्हा तो शेतातून कामावरुन परतत होता तेव्हाच एका विषारी सापाने त्याला डंख मारला. त्यामुळे संतप्त झालेल्या बदरा याने सापाला पकडले आणि त्याला नंतर आपल्या दातांनी चावून चावून ठार मारले.

या धक्कादायक घटनेवर बदरा याने असे म्हटले की, जेव्हा मी घरी येत होते तेव्हा पायाला काहीतरी चावले. मी तेव्हा टॉर्च सुरु केला आणि पाहिले असता तेव्हा एक विषारी साप दिसला. मी त्याच वेळी सापाला अद्दल घडवण्याचे ठरविले. मी त्याला हातात घेतले आणि ऐवढा वेळा त्याचा चावा घेतला की तो काही वेळातच मृत पावला.(Bihar Snake: बिहारमधील एका व्यक्तीने दंश केल्याच्या रागात सापाला चावे घेत मारले ठार, काही वेळाने व्यक्तीचाही झाला मृत्यू)

त्यानंतर बदरा याने मृत सापाला घरी सुद्धा आणले आणि संपूर्ण घटना आपल्या पत्नीला सांगितले. पाहता पाहता ही गोष्ट पूर्ण गावात पसरली. लोकांनी बदरा याला तातडीने रुग्णालयात उपचार घेण्यास सांगितले. मात्र त्याने असे करण्यास नकार दिला. त्याने रुग्णालयात जाण्याऐवजी स्थानिकच वैद्याला दाखवण्याचे ठरवले. आश्चर्यच मानावे लागेल की, साप चावल्यानंतर सुद्धा आणि सापाला चावून ठार मारल्यानंतर सुद्धा बदरा याला काहीच झालेले नाही.