झाडावरुन खाली उतरणाऱ्या बिबट्यावर लोकांची विनाकारण दगडफेक, सोशल मीडियात युजर्सकडून संताप व्यक्त (Watch Viral Video)
Leopard Viral Video (Photo Credits: Twitter)

Viral Video: निवासी भागात (Residential Areas) जंगली प्राणी (Wild Animals) पाहून अनेक वेळा लोक त्यांच्यावर दगडांनी हल्ला करू लागतात. अनेक वेळा लोक स्वतःचा जंगली प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करतात, परंतु काही वेळा काही लोक मजा करण्यासाठी प्राण्यांना अनावश्यक त्रास देताना ही आढळले आहेत. बिबट्यावर (Leopard) विनाकारण दगड फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक झाडावरून खाली येणाऱ्या बिबट्यावर दगड फेकताना दिसत आहेत.सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून लोकांचा संताप उफाळून आला आहे आणि ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना जोरदार फटकारत आहेत. (अमेरिकेच्या North Carolina मध्ये आढळला चक्क माणसांप्रमाणे दातांची रचना असलेला Sheepshead Fish )

हा व्हिडिओ विजय पिंजारकर नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून, त्याने कॅप्शनमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की,'किती लाजिरवाणी गोष्ट आहे, या व्हिडिओमध्ये नक्की प्राणी कोण आहे? काही पोलिसांसह या लोकांनी भंडाराजवळच्या झाडावर 2 बिबट्यांवर दगडफेक केली.' या व्हिडिओला आतापर्यंत 1K व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये झाडावरून बिबट्या खाली उतरताना दिसत आहे ,रस्त्याच्या कडेला उभे असलेले लोक त्याला बघतात. आणि बिबट्याला पाहिल्यावर हे लोक विनाकारण त्यावर दगडफेक करू लागतात. वास्तविक, बिबट्या या लोकांपासून दूर दिसत आहे आणि तो झाडावरून खाली उतरल्यावर सरळ जंगलाच्या दिशेने पळू लागतो, तरीही हे लोक उगाचच त्याच्यावर दगडफेक करू लागतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, नेटकरी दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत आणि या कृत्याचा निषेध करत आहेत.