अमेरिकेच्या North Carolina मध्ये आढळला चक्क माणसांप्रमाणे दातांची रचना असलेला  Sheepshead Fish
sheepshead fish | PC: Facebook/Jennette's Pier

अमेरिकेच्या (USA) नॉर्थ कॅरोलिना (North Carolina) भागामध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. चक्क माणसाप्रमाणे दातांची रचना असणारा एक मासा समोर आल्याने जगभरात त्याची चर्चा होत आहे. सोशल मीडीयात या माश्याच्या तोंडातील दातांचे फोटो वायरल झाले आहेत. दरम्यान Jeanette's Pier च्या फेसबूक पेज वर पहिल्यांदा त्याचे फोटो पोस्ट झाले आणि बघता बघता सर्वत्र त्याची चर्चा झाली. Jeanette's Pier हे नॉर्थ कॅरोलिना मधील फिशिंग स्कूल आहे. जो मासा सध्या त्याच्या दातांच्या रचनेमुळे लोकप्रिय होत आहे त्याच नाव Sheepshead Fish आहे.

Sheepshead Fish हा कडक जबडा आणि त्यांच्यामधील दात, दाढेच्या रचनेसाठी ओळखला जातो. याच्यामुळे तो ऑयस्टर, क्रॅब्स म्हणजेच खेकड्यांना फोडू शकतो. pier मध्ये एक सामान्य फिशर Nathan Martin ने हा मासा पकडला असल्याचं समोर आलं आहे. या माश्याच्या तोंडाची रचना sheep अर्थात मेंढी प्रमाणे असल्याने त्याचं नाव sheepshead fish आहे. नक्की वाचा: दक्षिण अमेरिकेतील 'Penis Snakes' आता Florida मध्येही आढळला.

सोशल मीडीयात नेटकर्‍यांनी देखील या वायरल फोटो वर धम्माल कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी माणसांपेक्षा माशांचे दात खूपच व्यवस्थित असल्याचं म्हटलं आहे.