दक्षिण अमेरिकेतील 'Penis Snakes' आता  Florida मध्येही आढळला
Penis Snake (Photo Credits: Twitter / @darkgryphon42)

पाय नसलेला उभयचर caecilians म्हणून ओळखले जातात. 'Penis Snakes' हा त्यांंच्यापैकीचा एक आणि आश्चर्याची बाब म्हणजे आता तो अमेरिकेमध्ये southern Florida मध्ये देखील आढळत आहे. जगभरात सुरू असलेल्या क्लायमेट चेंज, वातावरणीय बदलांमुळे आता जगात पूर्वी सामान्यपणे अज्ञात असलेल्या विविध विचित्र प्रजाती सहजपणे आढळायला सुरूवात झाली आहे. 'Penis Snakes'हा 'Rubber eels' म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

'Penis Snakes' हा 2019 मध्ये Miami International Airport फार दूर नसलेल्या Tamiami Canalमध्ये पहिल्यांदा आढळला होता. आता Florida Museum of Natural History ने या गुळमुळीत सरपटणार्‍या प्राण्याची डीएनए टेस्टिंग केल्यानंतर ही बाब समोर आली आहे की मूळचे कोलंबिया आणि व्हेनेझुएलाचे रहिवासी, तांत्रिकदृष्ट्या त्यांना "invasive" species बनवत आहेत. नक्की वाचा:  King Cobra Video: हिमाचल प्रदेशाच्या टेकड्यांवर चढताना दिसला किंग कोब्रा; लांबीच्या बाबतीत तोडला सर्व सापांचा रेकॉर्ड, पाहा व्हिडिओ .

Caecilians हे अवघ्या काही इंचापासून 5 फीट लांब असू शकतात.C-4 canal मध्ये सापडलेला 2 फीट लांब आहे. दरम्यान ते जलीय वनस्पतींसह, पाण्यातील काही उबदार घटकांवरही जगू शकतात. पण अजूनही संशोधकांना 'Penis Snakes'वर बराच अभ्यास करणं आवश्यक आहे.

अद्याप याबददल फार कमी माहिती उपलब्ध असली तरीही ते धोकादायक नसल्याचं समोर आलं आहे. Florida Museum’s Herpetology Collection च्या अहवालात Coleman Sheehy ने तसे लिहले आहे. ते लहान सहान प्राणी खाऊ शकतात तर त्यांची शिकार मोठ्या प्राण्यांकडून होऊ शकते. दरम्यान हे मूळचे दक्षीण फ्लोरिडा भागातील नाहीत.

सध्याच्या घडीला caecilians हे C-4 Canal मध्ये वास्तव्यास आहेत हे ठोसपणे सांगू शकत नाही. अजूनही ते शोधावं लागेल. असं कधीच वाटलं नव्हतं फ्लोरिडा मध्ये caecilian आढळतील हे आमच्यासाठी आश्चर्य आहे. अशा देखील भावना व्यक्त केल्या जात आहेत.