उत्तराखंड (Photo Credits: Twitter)

भारतामध्ये कोरोना व्हायरसचं संकट असताना आता उत्तर भारतामध्ये जंगलांमध्ये भीषण आग भडकत आहे. मागील 4 दिवसांपासून आग लगत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान उत्तर भारतात उन्हाचा तडाखा असल्याने आग लागण्याचं प्रमाण वाढत आहे. सुमारे 71 हेक्टर जंगलाचा भाग आगीत जळाला आहे. सोशल मीडीयामध्येही त्याचे अनेक फोटोज शेअर केले जात आहेत. ट्वीटर वरही आज #SaveTheHimalayas हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसला. अनेकांनी देवभूमी असलेल्या उत्तराखंडसाठी प्रार्थना करा असं आवाहन देखील केलं आहे.

आठवडाभराच्या काळात 45 आगी लागल्या आहेत. यामध्ये कुमाऊं क्षेत्र मध्ये आग लागल्याच्या 21 घटना, गढ़वाल मध्ये 16 घटना आणि अनरक्षित वन क्षेत्र असलेल्या जंगलामध्ये 9 घटना समोर आल्या आहेत. मिडीया रिपोर्ट्सनुसार, जंगलात आग लागल्याने 2 लोकांचा जीव गेला आहे. तर यामुळे वन्य प्राण्यांवरील संकटदेखील वाढलं आहे. दरम्यान या स्थितीबद्दल समाजात सजगता निर्माण करण्यासाठी #UttarakhandForestFire आणि #SaveTheHimalayas ट्रेंड होत आहेत.

मदतीचं आवाहन 

Uttarakhand Fire: उत्तराखंड मध्ये आगीच तांडव ; दिवसेंदिवस आग वाढत जात असल्याची चिन्ह- Watch Video

दरम्यान आम्ही तुमच्या नजरेस ही गोष्ट देखील आणू इच्छितो की, इंटरनेटवर व्हायरल होणार्‍या अनेक फोटोंमध्ये काही फोटो जुने असू शकतात. दरम्यान PIB Uttarakhand ने केलेल्या ट्वीट मधील ग्राफच्या आकलनानुसार यंदा मागील वर्षांच्या तुलनेत आग लागण्याचं प्रमाण कमी आहे. चुकीच्या बातम्या, माहितींपासुन दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.