फेक न्यूज (Photo credits PIB)

Fact Check: सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेक न्यूज (Fake News) आणि फेक इन्फॉर्मेशन (Fake Information) शेअर केली जाते. या बातम्या वाचल्यानंतर वाचकाला यातील कोणती माहिती खरी आहे किंवा खोटी आहे, यासंदर्भात कोणतीही माहिती नसते. सध्या अशाच प्रकारे सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. ही बातमी युट्यूब व्हिडिओवर व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये असा दावा केला गेला आहे की, केंद्र सरकार सर्व महिलांच्या बँक खात्यात ‘स्त्री स्वाभिमान योजने’ (Stree Swabhiman Yojana) अंतर्गत 1 लाख 24 हजार रुपये जमा करीत आहे.

पीआयबी फॅक्ट चेकमधून युट्यूब व्हिडिओ ग्रॅबने शेअर केलेल्या फोटोमध्ये असं लिहिलं आहे की, केंद्र सरकार सर्व महिलांच्या बँक खात्यात ‘स्त्री स्वाभिमान योजने’ अंतर्गत 1 लाख 24 हजार रुपये जमा करीत आहे. जेव्हा या वृत्ताच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने किंवा पीआयबीने चौकशी केली तेव्हा ते बनावट असल्याचं उघडकीस आलं आहे. यात असं म्हटलं आहे की, अशी कोणतीही योजना सरकार चालवित नाही. (हेही वाचा -Fact Check: 'जीवन लक्ष्य योजना' अंतर्गत केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यात 7 लाख रुपये जमा करत आहे? यूट्यूबवर व्हायरल झालेल्या या बातमीमागील सत्य जाणून घ्या)

दरम्यान, ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीआयबीच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, लोकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर सोशल मीडियावर अशा बातम्या व्हायरल होऊ नयेत म्हणून पोलिसाद्वारे उपाय-योजना करण्यात येत आहेत. परंतु, तरीही अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे कोणतीही बातमी शेअर करताना त्या बातमीची सत्यता तपासून पहा.